⚡कणकवली ता.०१-: पोलिस भरतीत जाण्याची इच्छा बाळगणार्या आणि कठोर प्रयत्न करण्याची तयारी असणार्या तरुण-तरुणींना तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळतेच असे नाही. म्हणूनच अनेक जणांचे पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न भंग पावते.त्यांच्यासाठी प्रशिक्षणाची ही गरज ओळखून ओरोस येथील गुरुकुल करिअर अॅकडमी ,ओरोस या जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेचे अग्रगण्य मार्गदर्शन करणार्या संस्थेमार्फत 6 नोव्हेंबर 2022 रोजी एक दिवशीय मोफत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या एक दिवसीय पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिरामध्ये तरुण-तरूणींसाठी विषय लेक्चर,कागदपत्र मार्गदर्शन,कमी कालावधीत यशस्वी होण्याचे मार्ग तसेच100 गुणांची लेखी परीक्षा व प्रश्नपत्रिका विश्लेषण पूर्णतः मोफत आयोजित करण्यात आले आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-तरुणींना हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.याचा जास्तीत जास्त तरुण आणि तरुणींनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुकुल अकॅडमीकडून करण्यात आले आहे.या प्रशिक्षण शिबीरात 5 नोव्हेंबर 2022 पर्यत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 7264920062 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन गुरुकुल अकॅडमीकडून करण्यात आले आहे.
