दिवाळी निमित्त जपली सामाजिक बांधिलकी
⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी येथील रासाई कला क्रीडा मंडळातील रोहित लाखे या युवका मार्फत दिवाळी सणानिमित्त मडूरा ( रेडकरवाडी ) येथील निराधार व गेल्या दोन वर्षापासून धनुर्वाद आजाराने अंथरुणाला खिळलेल्या तोरस्कर या तरुणाला जीवनावश्यक वस्तू व नवीन कपड्यांची भेट कुटुंबांकडे देण्यात आली आहे.
यावेळी तोरस्कर कुटुंबियांनी त्या युवकाचे आभार मानले.दरम्यान सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते दर महिन्याला या दानशूरांना घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात.
काही दिवसांपूर्वीच लाखे वस्तीतील या युवकांनी पणदूर येथील सविता आश्रमला अशाच प्रकारे जीवनावश्यक वस्तू दिल्या होत्या. तसेच सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांना त्यांचा नेहमीच सहभाग असतो.
