तळवडेत म्हाळईवाडीत
उद्या भजनी डबलबारी

⚡सावंतवाडी, ता.३०-: श्री म्हाळाई देवी कला-क्रीडा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्यावतीने दिवाळीनिमित्त सोमवारी (ता. ३१) रात्री ८ वाजता भारुडासह टी-ट्वेन्टी डबलबारी भजनाचा जंगी सामना तळवडे-म्हाळईवाडी शाळा क्र. ९ च्या पटांगणावर आयोजित केली आहे.

हा सामना मुंबई-भांडुप येथील श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळाचे बुवा सुशील गोठणकर (पखवाज-तुषार लोट, तबला-योगेश गोठणकर) विरुध्द मुंबई-दिवा येथील श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संतोष शितकर (पखवाज-हेमंत तवटे, तबला-गौरव पिंगुळकर) यांच्यात होणार आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भजनप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page