सिंधुदुर्ग युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची टीका …
⚡देवगड ता.२८-: शिंदे-फडणवीस सरकारने खास गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी राबविलेली “आनंदाचा शिधा’ ही योजना वस्ती वस्तीत आजतागायत पोहोचली नाही तर दुसरीकडे काही
स्वस्त धान्य दुकानात योजनेतील साखर किंवा रवा देखील पोहोचले नसल्याने सर्वसामान्य कुटुंबांच्या आनंदावर विरजन पडले आहे,ही योजना जनतेच्या भल्यासाठी नसून शिंदे फडणवीस सरकारला येणाऱ्या निवडणुकीत मत मिळवण्यासाठी जाहिरात बाजी आहे,
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मत मिळवण्यासाठी आनंदाचा शिधा ही योजना राबविण्यात येत आहे,
या किट वर असलेले राज्यातील नेत्यांचे फोटो म्हणजे एक प्रकारची प्रचार यंत्रणा राबवून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून राज्यात होत आहे,
यंदाची दिवाळी ही गोरगरिबांसाठी गोड दिवाळी असणार आहे, असे आश्वासन शिंदे सरकारने दिले होते. परंतु, अनेक स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा कीटमधील संपूर्ण साहित्य आलेले नाही. अनेक ठिकाणी कुठे तीन तर कुठे दोनच वस्तू कार्डधारकांना मिळत आहे.
स्वस्त धान्य दुकानदारांना विचारले असता एवढ्याच वस्तू आल्या असून राहिलेल्या आल्यावर मिळतील, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. मोठ्या आशेने आणि आनंदात शंभर रुपये घेऊन खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचा मात्र प्रत्यक्षात दोन किंवा तीनच वस्तू मिळाल्याने हिरमोड होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून अर्धवट साहित्य मिळाल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.अशी टीका सिंधुदुर्ग युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे,
