इच्छुकांना सहभागी होण्याचे सहसचिव दुभाषी यांचे आवाहन
⚡सावंतवाडी ता.२७-: महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन तर्फे सिंधुदुर्ग जिल्हा किक्रेट असोसिएशन यांची 14 वर्षाखालील मुलांची निवड चाचणी मालवण येथील टोपीवाला हायस्कूल जवळील मैदानावर रविवार 30 ऑक्टोबर ला होणार आहे.
तरी 1/9/2008 नंतर जन्मलेल्या मुलांना या निवड चाचणी सहभागी होता येणार आहे. तसे इच्छुक खेळाडूंनी पूर्ण गणवेशात यावे असे आवाहन जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या वतीने सहसचिव काशीनाथ दुभाषी यांनी केले आहे.
