वेंगुर्ला येथे शनिवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला येथील नितिश कुडतरकर मित्रमंडळातर्फे शनिवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० ते १० या वेळेत वेंगुर्ला-माणिकचौक येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  या स्पर्धेतील मोठ्या गटासाठी अनुक्रमे २०००, १५०० व १०००, छोट्या गटासाठी अनुक्रमे १५००, १००० व ५०० तर जोडी नृत्य स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांसाठी २५००, १५०० व १००० अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी आपली नावे ९१७५०८३०३१ या नंबरवर द्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
You cannot copy content of this page