*आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे रवींद्र तांबोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभ*
*💫कणकवली दि.०३-:* श्रीराममंदिर निधी संकलन जनजागृतीसाठी आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतील रामरथा चा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे रवींद्र तांबोळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पटकीदेवी मंदिराकडून करण्यात आला. अयोध्येतील श्रीराममंदिर निर्मितीच्या कार्यात सर्वसामान्य जनतेने निधी देत सहभाग द्यावा यासाठी जनजागृती करण्यासाठी रामरथ आजपासून सिंधुदुर्गात दाखल झाला आहे. पटकीदेवी मंदिरापासून रामरथ यात्रा शहरातील बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौकातून एसटी स्टँडसमोर आल्यानंतर सांगता झाली. यावेळी नगराध्यक समीर नलावडे, पं स सभापती मनोज रावराणे, विंहीप चे आरोलकर, भाजपा ग्रामीण मंडल तालुकाध्यक्ष संतोष कानडे, भाजपा शहर मंडल तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक अभि मुसळे, संजय कामतेकर, अशोक करंबेळकर, विठ्ठल देसाई, महिला भाजपा तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके, प्राची कर्पे, प्रकाश सावंत, संदीप मेस्त्री, नितीन पाडावे, आनंद घाडीगांवकर आदी उपस्थित होते.हा रामरथ कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्गात आठही तालुक्यांमध्ये जाणार आहे.
