*प्राथमिक शिक्षक भारती ने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

प्राथमिक शिक्षक व शाळा समस्यांबाबत केली चर्चा*

*💫सिंधूदुर्गनगरी दि.०३-:* प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्यावतीने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व शाळा समस्यांबाबत चर्चा २ फेब्रूवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांच्या सोबत करण्यात आली. यावेळी शिक्षक आ कपिल पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपस्थित होते. आ पाटील हे व्हीसीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी आ पाटील यानी आंतरजिल्हा शिक्षक बदली टप्पा क्रमांक ५ राबविण्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून हा टप्पा सुरु करण्यात येईल, असे आ पाटील यानी सांगितले. आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षाकाना कार्यमुक्त करण्याबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर यानी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त पदाबाबत वेळोवेळी शासनास देण्यात आलेली माहिती सांगितली. यावर जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, राज्य उपाध्यक्ष श्री दयानंद नाईक यांनी मुख्याध्यापक जागा, 2018-19 व 2019-20 ची संचमान्यता शून्य पटसंख्ये अभावी बंद झालेल्या शाळा व त्यामुळे अतिरिक्त ठरलेले शिक्षक, सेवा निवृत्ती मुख्यध्यापकांमुळे रिक्त झालेल्या जागा व शिक्षक भरती मधील विसंगती याकडे लक्ष वेधले व शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली. आंतरजिल्हा शिक्षक बदली टप्पा ५ बाबत बोलताना आ. कपिल पाटील यांनी सांगितले की, सध्या नोकर भरतीवर बंदी आहे. सिंधुदुर्ग रिक्त जागा असल्यामुळे आंतरजिल्हा बदली मध्ये निर्माण झालेल्या अडचणीचा अहवाल सीईओ यांच्या वतीने उपसंचालक, संचालक व ग्रामविकास विभाग यांना त्वरित पाठवावा. मी स्वतः संचालक व ग्रामविकास विभाग यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले. तसेच प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे शिष्टमंडळ, आतर जिल्हा बदली प्रतिनिधी मान. आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ग्रामविकास मंत्री मान.हसन मुश्रीफ व ग्रामविकास सचिव यांची भेट घेणार आहेत. डीसीपीएस हिशोब तक्त्यातील तफावती दुरुस्त केल्या जातील.तसेच 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची 10 महिन्याची अंशदान कपात रक्कम व 6 व्या वेतन आयोगाच्या फरकाचा 1 व 2 रा हप्ता अद्यापही प्रो.फंड खात्यात जमा नाही. तसेच सहाव्या वेतन आयोगाचा 3 रा व 4 था हप्ता आठ वर्षे झाली तरी डीसीपीएस तसेच प्रो. फंड खात्यात जमा नाही. याबाबत सतत चार वर्षे पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली.याबाबत मान. सीईओ यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली व डीसीपीएस कपात रक्कम,वेतन आयोगाचे सर्व हप्ते भविष्य निर्वाहनिधीत एप्रिल पर्यंत जमा रक्कम केली जाईल असे आश्वासन मा.मुख्यकार्यकारी अधिकार यांनी बैठकीत दिले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती नाईक , कक्ष अधिक्षक विनायक पिंगुळकर व लक्ष्मण डोईफोडे तसेच संघटनेच्या शिष्टमंडळात राज्य उपाध्यक्ष दया नाईक, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष वसंत गर्कल , मालवण तालुका अध्यक्ष संतोष कोचरेकर, देवगड तालुका अध्यक्ष विनायक कांबळे, शिक्षक प्रतिनिधी ईश्वर थडके. महिला प्रतिनिधी जयश्री दोडके व श्रीमती लोकडे उपस्थित होते.

You cannot copy content of this page