माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला शुभारंभ
⚡सावंतवाडी ता.२२-: राज्यातील गोर गरीब जनतेला शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळी गिफ्ट जाहीर केले असून, या मध्ये रेशन दुकानांवर केवळ १०० रुपयात एक किलो साखर, चणाडाळ, रवा, तेल देण्यात येणार असल्याचे सांगितले होते. याचे वितरण आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माजी नगरसेवक आनंद योगी विनोद सावंत सत्यवान बांदेकर आदी उपस्थित होते.
