विजय दामोदर : आत्मा अंतर्गत मालवण तालुका कृषी विभागातर्फे आचरा येथे शेतकऱ्यांना प्रक्षिक्षण
⚡मालवण ता.२०-: आंबा बागेपासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी आंबा कलमांचे पुनरजीवन करणे काळाची गरज असल्याचे मत आंबा फळ संशोधन केंद्र रामेश्वर विजयदुर्ग चे विजय दामोदर यांनी आचरा येथे व्यक्त केले.
यावेळी त्यांनी ज्या झाडांची उत्पादकता कमी झाली आहे, सुर्य प्रकाश मध्यापर्यंत पोहोचत नाही, आंबा फळाचे वजन दोनशे ग्रॅम पेक्षा कमी झाले असेल अशा झाडांचे पुनरजीवन करण्याची गरज असल्याचे सांगितले.
आत्मा अंतर्गत मालवण तालुका कृषी विभागातर्फेआचरा येथील बापर्डेकर यांच्या आंबा बागेत आंबा पुनरजीवन प्रक्षिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांच्या सोबत मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, आचरा मंडल कृषी अधिकारी दिनेश लंबे,कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे,आत्मा चे सहाय्यक तंत्रज्ञ निलेश गोसावी, कृषी सहाय्यक सुनील कदम,सुशिलकुमार शिंदे,अश्विन कुरकुटे, आचरा उपसरपंच पांडूरंग वायंगणकर,शेतकरी लक्ष्मण बापर्डेकर, सत्यवान बापर्डेकर, सत्यवान घाडीगांवकर,अभय भोसले, नंदकिशोर सावंत,रविंद्र बागवे,नंदकुमार तांडेल,समिर बावकर,गुरुप्रसाद कांबळी, ,प्रसाद चिंदरकर, राणे,स्वप्नील बापर्डेकर, यांसह अन्य शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी दामोदर यांनी आंबा बागांचे पुनरजीवन करताना आंबा कलमांची कशी तोड करावी ,कटींग केलेल्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी, खत व्यवस्थापन आदी बाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
