शेलटी नदी किनारी बेसुमार वाळू उपसा

लाखो रुपयांचे महसूल नुकसान;तहसीलदार यांनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी

⚡मालवण ता.२०-: कालावल खाडीपात्रातील हडी शेलटीवाडीच्या किनाऱ्यासमोर गेला महिनाभर रोज १२ ते १४ होड्या दुपारी १२ पासून रात्री उशिरापर्यंत अनधिकृतपणे बेसुमार वाळू उपसा करत आहेत. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे महसुली नुकसान होत आहे. तहसीलदारांनी पाहणी करून यात लक्ष घालून संबंधित अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून ताबडतोब अनधिकृत वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी हडी – शेलटी येथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सरकारी टेंडरच्या कालावधीत शेलटी येथील ग्रामस्थ शासनास अधिकृत कर भरून हातपाटीद्वारे वाळू उपसा करतात. त्यावेळी तोंडवळी तळाशिल ग्रामस्थ कायम खोट्या तक्रारी करून टेंडर बंद पाडतात. अशावेळी होडीवरील कामगारांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देतात व होडीवरील सामानाचे नुकसान करतात, असा आरोप निवेदनातून केला आहे.

You cannot copy content of this page