कृषी भूषण पुरस्कार विजेते राजाराम मावळकर यांचे दातृत्व
बांदा/प्रतिनिधी
गोवा शासनाचा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त फकीरफाटा (तोरसे-गोवा) येथील प्रगतशील व उपक्रमशील शेतकरी राजाराम मावळणकर यांनी बांदा येथील शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेला ४० हजार रुपये किमतीचा इन्वर्टर भेट दिला. यामुळे केंद्रशाळेतील संगणक कक्षात मुलांना विना व्यत्यय शिक्षण घेता येणार आहे.
श्री मावळणकर यांच्या दातृत्वाबाबत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, सरपंच अक्रम खान, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी आभार व्यक्त केलेत. यावेळी शिक्षक जे डी पाटील, प्रशांत पवार, रंगनाथ परब, उद्योजक शैलेश लाड, राकेश परब आदी उपस्थित होते.
