⚡कणकवली ता.२०-: मित्रप्रेम मित्रमंडळ शिरवल तळेवाडी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील सर्वच घटकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता.
यानिमित्ताने आयोजित केलेला महिलांसाठी चा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम रंगतदार ठरला. खेळ पैठणीची मानकरी सौ. रत्नप्रभा पार्सेकर या ठरल्या तर उपविजेते पदाचा मान साक्षी पार्सेकर यांना मिळाला. तर संगीत खुर्चीमध्ये सौ.साक्षी बिड्ये या ठरल्या. मान्यवरांच्या हस्ते यावेळी विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मित्रप्रेम मित्रमंडळ शिरवल तळेवाडीचे अध्यक्ष भाई पार्सेकर, चंद्रकांत पार्सेकर,गणेश
पार्सेकर, अजित कुडतरकर, अमोल कोरगावकर, गौरंग पार्सेकर, प्रवीण कोरगावकर,मोहन वारंग, जीजी कुडतरकर,राजन शिरवलकर,तेजस बिडये,मोहन आर्डेकर,सुभाष पार्सेकर,विजय पाताडे, प्रशांत कुडतरकर, दत्तप्रसाद पार्सेकर, दिगंबर मसुरकर, सौ.मनाली वारंग, ऋतुजा सावंत, गीता पार्सेकर, मनाली आरडेकर, रश्मी सावंत, श्वेता सावंत, समीक्षा पार्सेकर, कृतिका सावंत, सुहानी सावंत, नम्रता शिरसाट, रत्नप्रभा पार्सेकर, आनंदी कोरगावकर, सायली पार्सेकर,
अनिता कुडतरकर, मंडळाचे सदस्य व सर्व महीलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विलास गोलतकर यांनी केले तर परीक्षण व गुणलेखन गावडे यानी केले.
