लाभ घेण्याचे वाचनालयाच्यावतीने आवाहन
⚡बांदा ता.२०-: नट वाचनालय, बांदा या संस्थेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘दिवाळी अंक योजना’ राबविली जाणार आहे.या योजनेमार्फत आरोग्यविषयक शतायुषी, दीर्घायू, विनोदसम्राट आवाज, जत्रा भविष्यविषयक माहिती देणारे ग्रहांकित, धनुर्धारी तसेच अनेक रहस्यमय कथा – कादंबऱ्यांनी नटलेला चंद्रकांत, वसुधा, माहेर, धनंजय याचबरोबर विविध पदार्थाची चव देणारे अन्नपूर्णा, रूचिपालट असे अनेक दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध होणार आहेत.
तरी सर्व साहित्यप्रेमींनी या योजनेची वर्गणी शंभर रूपये भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
