ठाकरे शिवसेना गटाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा संजू परब यांना इशारा
⚡सावंतवाडी ता.२०-: संजू परब यांनी अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलिसांना जाहीर आवाहन केले होते. पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा या मागच्या गॉडफादर चे नाव जाहीर करणार आहोत असे म्हटले होते ते वाचनात आले. त्यामुळे परब यांनी अवैध धंदे करणाऱ्यांची नावे पोलिसांना देण्यासाठी कोणी रोखून धरले बोले तैसा चाले असे परब यांनी प्रथम वागावे नंतर आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीका करावी. आमदार जाधव यांच्या बाबतीत काहीच माहित नसताना धन्यासाठी काही बोलल्यास शिवसेना खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिल आहे.
पुढील बातमी अपडेट होत आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की आमदार भास्कर जाधव कष्टकरी शेतकरी आहेत आजही ते चिखलात उतरून शेती करतात अवैध धंदे करत असल्याचे टीका करणाऱ्या संजू परब यांनी त्यांच्यावर एक तरी गुन्हा दाखल असल्याचा दाखवून द्यावे परब यांनी पोलिसांना जाहीर आवाहन करून या मागचा गॉड फादर कोण हे आपण सांगणार म्हटलं होते. ते जाहीर न केल्यामुळे संजू परब जनतेसमोर उघड पडले असल्याने नाक टीका करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राऊळ म्हणाले.
