आ. नितेश राणेंनी वैभववाडीतही सेनेला पाडले खिंडार;

कुर्लीतील शिवसैनिक भाजपात

⚡कणकवली ता.१९-: भाजपा आमदार नितेश राणे यांनी देवगडपाठोपाठ वैभववाडी तालुक्यातही उद्धव ठाकरे सेनेला धक्का दिला आहे. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश पाटील, सोसायटी संचालक विलास पोवार, पांडुरंग परब, दूध डेअरी चेअरमन दशरथ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल झाले आहेत.शिवसैनिकांनी राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला.

यावेळी दीपाली पाटील, पराग पाटील, ग्रा पं सदस्य विजया पवार, उर्मिला सावंत, सत्यवान पाटील, बापू सावंत, मधुकर सावंत, कृष्णा सावंत, संदीप पवार, बबन हुंबे, रामचंद्र बोडेकर, धाकू शेळके, अनंत सूद, अरुण सूद, सुजित पडवळ, आदी प्रमुख शिवसैनिकांनीआमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे कमळ हाती घेतले. जिल्हा बँक संचालक तथा माजी जि प सभापती दिलीप रावराणे, कुर्ली माजी सरपंच अंबाजी हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ली गावातील शिवसैनिकांनी राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर भाजपात प्रवेश केला.

You cannot copy content of this page