⚡कणकवली ता.१९-: कणकवलीत भारतीय जनता पक्षाच्यावतीने शिवसेना नेते आम.भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी राणे कुटूबियांच्या विरोधात टीका केल्यास याद राखा,असा इशारा देत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी नीम का पत्ता कडवा है, भास्कर जाधव भडवा है..,भारतीय जनता पार्टी चा विजय असो,राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है.. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टी कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री,शहराध्यक्ष अण्णा कोदे,मेघा गांगण, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे,निखिल आचरेकर, गणेश तळगावकर ,स्वप्नील चिंदरकर, सचिन पारधिये , संदीप सावंत, आनंद घाडीगावकर,विजय चिंदरकर, समीर प्रभूगावकर, नितीन पाडावे,नयन दळवी,सर्वेश दळवी,पपू पुजारे आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
