⚡मालवण ता.१८-: अखिल भारतीय कोंकणी परिषद च्या नवीन कार्यकारी समितीवर गोवा, कर्नाटक,केरळ,आणि महाराष्ट्रच्या सदस्यांनी तिसऱ्यांदा ज्यास्त मतांनी २०२२- २४ या कालावधीसाठी रुजारिओ पिंटो (मालवण) यांची सदस्यपदी एकमुखी निवड केली. पिंटो यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक साधली.
अखिल भारतीय कोंकणी परिषदेची निवडण्यात आलेली कार्यकरणी पुढीलप्रमाणे:- अध्यक्ष – अरूण उभयकार( कुमठा), उपाध्यक्ष – मेल्विन रोड्रिगीस(मंगळूर), कार्याध्यक्ष – चेतन आचार्य (मडगांव), उपकार्याध्यक्ष – आर्.एस्.भास्कर (केरळ), लोरेन्स कामानी(महाराष्ट्र), अनिल पै (गोंय),
सरकार्यदर्शी – गौरिश वेर्णेकार (काणकोण), पालवी कार्यदर्शी – माया खरंगटे(मडगाव), खजिनदार – शिरिष पै (काणकोण), सदस्य – रूजारिओ पिंटो (महाराष्ट्र), पी.क्रिश्णन (केरळ), टायटस नोरोन्हा (कर्नाटक).
