⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडीत प्लास्टिक विकणाऱ्या व्यवसायिकांसह विक्रेत्यांना आज नगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाकडून दणका देण्यात आली असून, आज अचानक राबवण्यात आलेल्या मोहिमेमधून कारवाई करत दंड ठोठावण्यात आला आहे.
ही कारवाई प्लास्टिक बंदी पथक आणि नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रत्नागिरीचे अमित लाटे, आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, परवीन शेख, आदी पालिका कर्मचारी उपस्थित होते.
