देवगड पोलीस निरीक्षकांचा इशारा;संशय असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचेही केले आवाहन
देवगड
देवगड तालुक्यात मुले पळविणारी टोळी आली असल्याचा अफवा पसरविले जात असून काही नागरिक सोशल मीडियाचा गैर वापर करून अफवा पसरवीत आहेत.अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. प्रसंगी अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तरी नागरिकांनी अफवा न पसरविता प्रसंगी संयशीत घटनेची माहिती पोलीस प्रशासनास द्यावी .असे आवाहन देवगड पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी केले आहे.
सोमवारी कुणकेश्वर देवगड मार्गावर एका चारचाकी मधून आलेल्या.व्यक्तींनी रस्त्यामधील दोन शाळकरी मुलांना बोलवून विचारणा केली असता त्या मुलाने पलायन करून शाळा गाठली व पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सर्वत्र नाकाबंदी केली व संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेतला असता तशी कोणतीही घटना घडली नसून सदर वाहन नजीकच्या भागात आवश्यक ती माहिती घेऊन निघून गेले .परंतु एका व्यक्तीने टोळी आल्याची अफवा सोशल मीडिया द्वारे पसरवली त्याचा शोध घेऊन त्याला योग्य ती समज देण्यात आली आहे.अशा प्रकारच्या जनतेत घबराट पसरविणारे वृत्त पसरवू नये असे आवाहनही पोलीस निरीक्षक श्री बगळे यांनी केले आहे.
