१५ वर्षाखालील मुलींच्या लेटरबॉल जिल्हा क्रिकेट संघाच्या निवडीसाठी २३ रोजी निवड चाचणी

⚡सावंतवाडी ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असो. तर्फे १५ वर्षाखालील मुलींच्या लेटरबॉल जिल्हा क्रिकेट संघाच्या निवडीसाठी निवड चाचणी २३ ऑक्टोबर रोजी सांवतवाडी जिमखाना मैदानावर होणार आहे. पाऊस असल्यास निवड चाचणी खासकीलवाडा येथील माजी नगरसेवक श्री उदय नाईक यांच्या घरासमोर घेतली जाईल.

महाराष्ट्र क्रिकेट असो. तर्फे यावर्षी १५ वर्षाखालील मुलींची निमंत्रण साखळी स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात उत्तम कामगीरी करणाऱ्या खेळाडुची महाराष्ट्र संघात निवड होऊ शकते. या संधीचा लाभ जास्तीत जास्त मुलीनी घ्यावा असे आवाहन काशिनाथ दुभाषी यांनी केले आहे. निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या मुलींचा जन्म १सप्टेंबर २००७ नंतर झालेला असावा. इच्छुकांनी क्रिकेटच्या गणवेशात क्रिकेटच्या साहित्यासह व आधार कार्ड, फोटो सहीत सकाळी ९.३० वाजता हजर रहावे.

You cannot copy content of this page