⚡सावंतवाडी ता.१७-: :* मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने वाचकांसाठी यावर्षी दिवाळी अंक योजना राबविण्यात येत आहे. ही योजना सर्वांसाठी खुली आहे.
यामध्ये दर्जेदार दिवाळी अंक फक्त ५० रुपये एवढी रक्कम भरून वाचावयास मिळणार आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घेऊन दिवाळीचा आणि दिवाळी अंक वाचनाचा आनंद लुटावा,असे आवाहन वाचन मंदिर तर्फे करण्यात आले आहे.
