कणकवली न.पं.च्या वर्धापन दिना निमित्त उदया आजी-माजी नगरसेवकांचे स्नेहसंमेलन

⚡कणकवली ता.१७-: कणकवली नगरपंचायतीला मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ रोजी २० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्त कणकवली नगरपंचायतच्या आजी-माजी नगरसेवक व कर्मचारी यांचे स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

तरी मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायं. ४ वा. नगरवाचनालय हॉल येथे सोहळा होणार आहे. तसेच यावेळी कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page