सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी पाच मुली घेतल्या दत्तक तर १३ जणांची विम्यासाठी केली निवड
⚡सावंतवाडी ता.१७-: सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश पांचाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर चार च्या पाच मुली सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी दत्तक घेतलेल्या असून 13 विद्यार्थी विमा संरक्षणासाठी निवडलेले आहेत. त्यांच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिनंदनीय अशा सामाजिक कार्याबद्दल शाळेतर्फे श्री पांचाळ यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती
जिजामाताग्रुप व शिवाई बचतगटाच्या महिलांनी केक कापून श्री. पांचाळ यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री जाधव श्री पांचाळ यांच्या सामाजिक कार्याबद्दल ची माहिती सर्वांना करून दिली व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शाळेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्यात.
यावेळी अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. विलास सावंत , मुख्याध्यापक श्री पावरा सर , शिक्षक श्रीम.लक्ष्मी धारगळकर, कविता धुरी श्रीम. प्रणिती सावंत, श्री अमर पाटील श्री पवार मॅडम, अंगणवाडी शिक्षिका श्रीम. बांदेकर ,मदतनीस ,श्रीम. कुडतरकर मॅडम विलास सावंत अमित भराडी, लतिका सिंग, नेहा काष्टी साक्षी गवस अस्मिता भराडी उमा पांचाळ विद्यार्थी वर्ग व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता.
