झरे 2 च्या सरपंचपदी श्रुती देसाई तर पाट्ये पुनर्वसनाच्या सरपंचपदी प्रवीण गवस विजयी
⚡दोडामार्ग ता.१७-: तालुक्यातील झरे – 2 व पाटये पुनर्वसन या दोन ग्रामपंचयातच्या निवडणुका काल पार पाडल्या होत्या. यामध्ये सरपंच पदी झरे-२ मधून श्रुती देसाई हया ८६ मतांनी निवडून आल्या तर पाटये पुनर्वसन सरपंच पदी प्रविण गवस हे २१ मतांनी निवडून आले चुरशीच्या निवडणूकीत भाजपने बाजी मारली आहे थेट तहसील कार्यालया समोर सूक्ष्म लघु मध्यम केंद्रिय उद्योगमंत्री नारायणराव राणे भाजपा कार्यकर्ते व नूतन सरपंच यांचे अभिनंदन केले यावेळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते दोन्ही गाव तिलारी आंतर राज्य प्रकल्प बाधीत गावाचे पुनवर्सन क्षेत्रातील असून या ठिकाणच्या या ग्रा. पं. निवडणुकीसाठी थेट सरपंच व सदस्य पदासाठी काल मतदान प्रक्रिया पुर्ण झाली होती यापूर्वी झरे 2 मधील प्रभाग तर पाटये पुनर्वसन मध्ये केवळ एक सर्वसाधारण स्त्री सदस्य बिनविरोध निवडुन आली होती.
झरे 2 ग्रा. पं. अंतर्गत आयनोडे व सरगवे पुनर्वसन हे दोन गाव येतात. या ठिकाणी 391 पुरुष व 384 स्त्री असे एकूण 775 मतदार आहेत. थेट सरपंच पदासाठी श्रुती विठ्ठल देसाई (सरगवे पुनर्वसन ) ३३१ मते व रंजना विष्णू सावंत ( आयनोडे पुनर्वसन ) २४५ मते व हे दोन सर्वसाधारण स्त्री उमेदवार यांच्यात लढत झाली होतीत्यात श्रुती देसाई निवडून आल्या. प्रभाग क्रमांक 2 मध्ये पुरुष 118 व स्त्री 116 असे एकूण 234 मतदार आहेत. या प्रभागात अपूर्वा अभय ठाकूर (आयनोडे पुनर्वसन) ११४मते व करूणा कृष्णा सावंत ४९मते ( आयनोडे पुनर्वसन ) तसेच सुजाता सुनील सावंत७३ मते ( आयनोडे पुनर्वसन ) व संजना संदीप सावंत ९७मते ( आयनोडे पुनर्वसन ) यांच्यात लढत झाली यामध्ये विजयी. हा प्रभाग सर्वसाधारण स्त्री साठी आरक्षित झाला आहे.प्रभाग क्रमांक 3 मध्ये पुरुष 98 व स्त्री 102 असे एकूण 200 मतदार आहेत. या प्रभागात सर्वसाधारण स्त्री आरक्षण अंतर्गत अनिषा आनंद नाईक११९मते ( आयनोडे पुनर्वसन ) व मृणाली मंगेश नाईक३८मते ( आयनोडे पुनर्वसन ) तर सर्वसाधरण अंतर्गत उल्हास बुधाजी सावंत १२० मते विजयी ( आयनोडे पुनर्वसन ) व रामचंद्र विठोबा सावंत ३८मते (आयनोडे पुनर्वसन ) यांच्यात लढत झाली.
पाटये ग्रामपंचायत सासोली खुर्द
या ठिकाणी पुरुष 226 व स्त्री 186 असे एकूण 412 मतदार आहेत. थेट सरपंच पदासाठी प्रवीण पांडुरंग गवस, ११५ मते सत्यवान विष्णू गवस, ९४मते स्मिता सत्यवान गवस, ६७मते सुनील हरिश्चंद्र गवस, ६५ मते नारायण लक्ष्मण गवस१५मते हे पाच उमेदवार यामध्ये लढत झाली यामध्ये हे प्रविण गवस हे २१ मतांनी विजयी झाले आहेत. या ग्रा. पं. चे सरपंच पद सर्वसाधारण साठी आरक्षित झाले आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये पुरुष 73 व स्त्री 63 असे एकूण 136 मतदार असून भिवा शिवराम गवस, ८५मते व विठ्ठल पांडुरंग गवस २६ मते यांच्यात लढत होऊन भिवा गवस हे ५९ मतांनी विजयी झाले आहे. हा प्रभाग सर्वसाधारण आरक्षित झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये पुरुष 82 व स्त्री 67 असे एकूण 149 मतदार आहेत. या प्रभागात सर्वसाधारणसाठी आरक्षित झालेल्या या प्रभागात मधुकर धोंडू गवस, २६ मते सुभाष गुंडू गवस, ४४ महेश मोतीराम गावडे ६१ मते यांच्यात लढत झाली यामध्ये महेश गवस हे १७ मतांनी विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पुरुष 71 व स्त्री 56 असे एकूण 127 मतदार आहेत. श्रेया संतोष गवस, ८५ मते
गुणवंत भगवान गावडे ७७मते व शुभदा शशिकांत पाटयेकर ३७ मते या सर्वसाधरण स्त्री उमेदवारांमध्ये लढत झाली यामध्ये मतांनीश्रेया गवस व गुणवती गावडे हया विजयी झाले तर सर्वसाधरण जागेसाठी देवानंद काळोजी गवस५९मते व साईनाथ प्रभाकर नाईक ४६मते यांच्यात लढत झाली यामध्ये हे देवानंद गवस १३ मतांनी विजयी झाले.
- यापूर्वी झरे 2 मध्ये प्रभाग क्रमांक 1 बिनविरोध तर पाटये पुनर्वसन मध्ये एक स्त्री उमेदवार बिनविरोध* * झरे 2 ग्रा. पं. अंतर्गत प्रभाग क्रमांक 1 हा पूर्णतः बिनविरोध झाला आहे. या प्रभागात पुरुष 175 व स्त्री 166 असे एकूण 341 मतदार आहेत. अर्जुन कृष्णा आयनोडकर ( आयनोडे पुनर्वसन ) हे अनुसूचित जाती तर योगिता योगेश शेटये (सरगवे पुनर्वसन ) या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि पूर्वा विठ्ठल गवस (सरगवे पुनर्वसन) सर्वसाधरण स्त्री हे उमेदवार बिनविरोध यापूर्वी निवडून आले होते. तर पाटये पुनर्वसन मधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वसाधरण स्त्री साठी गौरव गुरुदास गवस बिनविरोध निवडून आल्या होत्या
