उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषीसेवकांचा सन्मान

⚡सावंतवाडी ता.१७-: अंकुश माने विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग, ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हास्तरीय आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये फळबाग लागवड योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषीसेवकांचे अंकुश माने यांच्याहस्ते विशेष कौतुक करण्यात आले.

यामध्ये चौकुळ कृषीसेवक सावंता घेरडे, शिरशिंगे कृषीसेवक अक्षय खराडे, सांगेली कृषीसेवक अनमोल गावडे, आरोंदा कृषीसेवक प्रिया पवार व केसरी कृषीसेवक मिलिंद निकम यांनी फळबाग लागवड योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिवेकर तसेच उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अडसूळे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page