खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजप – बाळासाहेब सेनेने खोलले खाते

दत्ताराम कोळपे बिनविरोध;
मविआच्या गंगाराम शेळके यांचा अर्ज अवैध

⚡सावंतवाडी ता.१७-: भाजप’ अन् ‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांच्यात पहिली युती ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात झाली होती. याला निमीत्त ठरलं होतं ते सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची निवडणूक. याच निवडणूकीत महाविकास आघाडीला बाळासाहेबांची सेना अन् भाजप युतीने पहिला धक्का दिला आहे. खरेदी विक्री संघावर युतीची एक जागा ही बिनविरोध निवडून आली आहे. यामुळे खरेदी-विक्री संघात युतीने आपलं खात खोलल आहे. मविआचे गंगाराम शेळके यांचा अर्ज अवैध ठरल्यानं युतीचे दत्ताराम कोळमेकर हे भटक्या विमुक्त जातीतून बिनविरोध ठरले आहेत.

खरेदी-विक्री संघात झालेली युती ही आगामी निवडणुकांत देखील दिसून येईल असा विश्वास दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. यात खरेदी विक्री संघातील १५ जागांपैकी एका जागेवर युतीचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यान बाळासाहेबांची शिवसेना व भाजपात उत्साहाच वातावरण पहायला मिळत असून ही युतीच्या ताकदीची अन् विजयाची नांदी असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे.

You cannot copy content of this page