भटवाडी येथे शाळेमध्ये आरोग्य शिबिर संपन्न

नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत

⚡सावंतवाडी ता.१६-: “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियाना अंतर्गत कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त भटवाडी सावंतवाडी जि. प. शाळा नं 6 येथे विशेष महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले. यामध्ये वजन, रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन तपासणी इत्यादी तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली.तसेच यावेळी आभा योजनेच्या हेल्थ कार्डची नोंदणीही करण्यात आले. या उपक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लांबर व शाळेचे उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


. यावेळी मा. नगरसेविका दिपाली भालेकर, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सायली लांबर, डॉ. मनीषा सावंत, आरोग्य सेविका मोहिनी जाधव, आरोग्य सेविका शुभांगी नाईक, समुपदेशक अदिती कशाळीकर, सुनील सोनसुलकर, अमित लिंगवत, वृषाली पांगम आदी उपस्थित होते.

या योजनेचा लाभ बहुसंख्य महिलांनी घेतला. ज्यांना येणे शक्य झाले नाही त्यांनी आभा योजनेचे हेल्थ कार्ड बनवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे हेल्थ कार्ड बनवून घ्यावे असे आवाहन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांनी केले.

You cannot copy content of this page