ढगफुटीसदृश्य कोसळलेल्या पावसाने कणकवलीत धुमाकूळ

⚡कणकवली ता.१६-; ढगफुटीसदृश्य कोसळलेल्या पावसाने कणकवली तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोसळत होता.या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची भीती आहे.पाऊस जाण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

गेल्या चार दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ भरून येत असून जोरदार पाऊस कोसळत आहे तशाच प्रकारचा पाऊस आजही सुरू झाला मात्र आज पाऊसाचा जोर भयानक होता.जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने आपले उग्ररूप दाखविण्यास सुरुवात केली.भर दिवसा पावसाने काळोख केला होता. सायंकाळी 7 वाजेपर्यात हा जोर कायम होता.
रविवार असल्याने अनेकांनी आपल्या घरी थांबने पसंत केल्याने बाजारातही शुकशुकाट होता.

You cannot copy content of this page