मालवण बेळणे रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी तोडा

अजित प्रभू यांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी

मालवण दि (प्रतिनिधी)

मालवण ते बेळणे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवर मोठ्या प्रमाणात गवत व झाडी उगवल्यामुळे या मार्गावरून समोरासमोर दोन वाहने आल्यास वाहनांना बाजू घेताना अडचण येते आहे. त्यामुळे या मार्गावरील साईडपट्टीची त्वरित साफसफाई करण्याची मागणी मसदे येथील अजित प्रभू व वाहनचालकांनी केली आहे.

गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत या रस्त्याच्या साईडपट्टीची साफसफाई केली होती. मात्र, यंदा पावसाळा संपत आला, तरी साईडपट्टी साफसफाईची कोणतीही कार्यवाही केली नसल्याने वाहनाला बाजू देताना मोठी गैरसोय होत आहे. याबाबत वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page