माझ्यावरील टीका कोकणी जनता सहन करणार नाही

केंद्रीयमंत्री नारायण राणे;माझ्या टीका करण्यासाठी नेमलेल्या वक्त्यावरून ठाकरे सेनेचा घरलेला दर्जा दिसतो

⚡सावंतवाडी ता.१६-: नारायण राणेंवर टीका केलेली कोकणी जनता कधीही सहन करणार नाही. कारण गेल्या पस्तीस वर्षात कोकणात विकास प्रगती काय असते हे आपण दाखवून दिले. आत्ताच मी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो. कोकणातील सर्व धरणे तुडुंब भरली असून येथे भविष्यात पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. ही धरणे रस्ते तसेच जिल्ह्यातील विकास कामे ही मीच मार्गी लावली आहेत. माझ्यावर टीका करणाऱ्यांचं कोकणच्या विकासात काय योगदान आहे. टीका करणारे समोर येऊन उभे राहण्याची हिंमत तरी दाखवतील का, असा सवाल उपस्थित करतानाच दसरा मेळाव्यात माझ्यावर टीका करण्यासाठी ज्यांना वक्ते केले होते त्यावरून ठाकरे शिवसेनेचा घसरलेला दर्जाच दिसून आला, अशा शब्दात त्यांनी टीकाकारांचा राणें यांनी समाचार घेतला.

You cannot copy content of this page