शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेसाठी संयोजक आणि सहसंयोजक यादी तयार

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी तयार केली यादी;प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले पत्र

⚡सावंतवाडी ता.१६-: भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी शिक्षक मतदार संघ निवडणूक प्रक्रियेसाठी संयोजक आणि सहसंयोजक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यादी तयार केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठविले आहे.

संयोजक आणि सहसंयोजक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तयार केलेली ही यादी पुढीलप्रमाणे-जिल्हा संयोजक अशोक वासुदेव सावंत, सहसंयोजक प्रमोद रावराणे, सच्चिदानंद (संजू) जगन्नाथ परब, संध्या प्रसाद तेरसे, तालुका सहसंयोजक, वेंगुर्ला-प्रसन्ना (बाळू) देसाई, दोडामार्ग-संतोष दिनकर नानचे, सावंतवाडी-प्रमोद मधुकर कामत, मालवण-महेश मांजरेकर, कुडाळ- अनिल (बंड्या) वामन सावंत, कणकवली-मनोज रावराणे, देवगड-संजय बांबुळकर, वैभववाडी-सुधीर नकाशे यांची निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page