कणकवली शहर शिवसेना व युवासेनेतर्फे 23 रोजी नरकासुर स्पर्धा

⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहर शिवसेना -युवासेनेच्या वतीने 23 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शिवसेना शाखा (नरडवे फाटा ) येथे रात्रौ ९:३० वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 10 हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये व सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक 5 हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तरी कणकवली शहरातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी नरकासुर स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख उमेश वाळके, ,प्रमोद मसुरकर, युवासेना शहरप्रमुख आदित्य सापळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page