रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने दीपक केसरकर यांना निवेदन

*केरोसीन संघटना चालविताना येणाºया अनेक समस्यांबाबत वेधले लक्ष

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार केरोसीन संघटना सावंतवाडी चालवत असताना त्यांना अनेक समस्या येत आहेत. या समस्यांबाबत रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांना निवेदन देण्यात आले. संघटनेने या समस्यांबाबत केसरकर यांचे लक्ष वेधले. निवेदनात म्हटले की, सावंतवाडी तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानदार ५९ व केरोसीन संघटना मिळून शिक्षाधारकांना शासनामार्फत सुविधा पुरविली जाते. पण गेल्या काही वर्षांत आॅनलाईन धान्य वितरण करत असताना धान्य दुकानदारांना अथवा सेल्समनला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रेबिट मार्जिन सध्या १.५० रूपये आहे ते वाढवून २.५० रु. करण्यात यावे. आधार कार्ड लिंक न झाल्यामुळे आॅफलाईन शिधापत्रिकाधारकांना धान्य न मिळाल्यामुळे ते शिधापत्रिकाधारक दुकानदारांशी हुज्जत घालतात. त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. कोविड काळात मृत पावलेल्या धान्य दुकानदारांच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी, धान्य दुकानदारांना विमा पॉलिसी मिळावी. या संदर्भात दखल घेऊन वरील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच जिल्हा पुरवठा अधिकाºयांसोबत या संदर्भात बैठक आयोजित करावी, अशी मागणीही संघटनेच्यावतीने करण्यात आली.

You cannot copy content of this page