अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मळेवाड-कोंडुरे शिवसेनेच्यावतीने सत्कार

*💫सावंतवाडी दि.०२-:* सावंतवाडी तालक्यातील, मळेवाड भटवाडी शाळा नं. ३ या अंगणवाडी शाळेला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदतर्फे देण्यात आलेला आदर्श अंगणवाडी पुरस्कार मिळाल्याने मळेवाड-कोंडूरे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने अंगणवाडीच्या सेविका समीक्षा नाईक व मदतनीस स्वराली शिरोडकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केशव रेडकर, बाळा शिरसाट, प्रकाश पार्सेकर, मळेवाड माजी उपसरपंच दिलीप मुळीक, मुन्ना मुळीक, नंदू नाईक, श्रीकांत नाईक, बाबुराव पार्सेकर, शंकर पार्सेकर, संतोष मुळीक, तातो सावळ, बाळा रेडकर, अंगणवाडी सेविका, प्रियांका पार्सेकर, पूर्वा नाईक, मानसी सातार्डेकर, पुष्पलता नाईक, संगीता माळकर उपस्थित होत्या. यावेळी अंगणवाडी सेविका समीक्षा नाईक व मदतनीस स्वराली शिरोडकर यांना त्यांच्या यशाबद्धल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. बाबुराव पार्सेकर यांनी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. राजन मुळीक यांनी अभिनंदन करून आपल सहकार्य कायम राहील, असे सांगून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना बाळा शिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन नंदकिशोर नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page