*💫सावंतवाडी दि.०२-:* युवक कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे हे ४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून , या दौऱ्यात ते युवक कॉंग्रेस मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी ते सावंतवाडीच्या संस्थांनास भेट देणार असून, कुडाळ येथील लोककला जपणारे पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांची देखील भेट घेणार आहेत. तसेच कणकवली येथील गोपुरी आश्रम ला देखील भेट देणार आहे. तसेच यावेळी ते देवगड बंदर पाहणी करणार असून, मच्छिमार, चिरेखाण व इतर जनतेच्या समस्या संदर्भात संवाद साधणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.यावेळी कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, सिद्धेश परब,कौस्तुभ गावडे, स्वप्नील परब, जास्मिन लक्ष्मेश्वर, फिजा मकानदार, आदी उपस्थित होते.
युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे ४ फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्यावर
