5 लाख 75 हजाराच्या वैकुंठ रथाचे समीर नलावडे यांनी स्वखर्चातून केले लोकार्पण
⚡कणकवली ता.०६-: कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वडील कै. अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ तब्बल 5 लाख 75 हजार रुपये किमतीचा वैकुंठरथ कणकवली शहराकरिता लोकार्पण केला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील हा अशा प्रकारचा पहिला वैकुंठरथ असून भाई नलावडे यांची आठवण तेवत रहावी व त्यांच्या राजकीयसह सामाजिक कामाची आठवण राहावी या दृष्टीने हा वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आल्याचे नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी सांगितले.
कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत त्या सत्यात उतरवण्याचा धडाका सातत्याने सुरू असतो. अशाच उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या साडेचार वर्षात नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेगवेगळ्या उपक्रमांमधून लोकाभिमुख कामावर भर दिला. अशाच एका नाविन्यपूर्ण उपक्रमाचे लोकार्पण नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून गुरुवारी करण्यात आले. कणकवली शहरातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर या व्यक्तीला रुग्णवाहिका किंवा अन्य वाहनाद्वारे अंत्यसंस्कारासाठी न्यावे लागते. मृत्यू झालेली व्यक्ती ही गोरगरीब असली तरी मृत्यू झाल्यानंतर देखील त्या व्यक्तीचा आदर राखला जावा तसेच श्रीमंतांसोबत गोरगरिबांना देखील अशा प्रकारे एक सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने हा वैकुंठरथ तयार करत त्याचे लोकार्पण केल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. टाटा कंपनीचा छोटा हत्ती हा टेम्पो खरेदी करून त्या टेम्पोमध्ये मॉडिफिकेशन करून हा वैकुंठरथ बनवण्यात आला आहे. कणकवली शहरातील मृत्यू झालेल्या कोणत्याही नागरिकांच्या कुटुंबीयांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून हा वैकुंठरथ अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी दिला जाणार आहे. या वैकुंठ रथामध्ये इंधनासहित चालकाचा खर्च देखील नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून केला जाणार आहे. या वैकुंठरथाच्या मागणी करिता नगराध्यक्ष समीर नलावडे किंवा भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्याशी त्यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. कणकवली शहराचे तत्कालीन ग्रामपंचायतचे पाच वर्षे उपसरपंच व त्यानंतर पंधरा वर्षे कझ्युमर्स सोसायटीची चेअरमन राहिलेले अनंत उर्फ भाई नलावडे यांच्या स्मरणार्थ जनते च्या सेवेसाठी हा रथ उपलब्ध करण्यात आल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले.या रथाला लाईटची व्यवस्था व जय राम श्रीराम ची ऑडिओ क्लिप लावण्यात आली आहे. शिवाजी परब व प्रकाश परब यांच्याकडे चावी सोपवणार. व ते संजय मालंडकर,रमेश काळसेकर ,भरत उबाळे,अण्णा कोदे,समीर पारकर,सदा पारकर,शिवाजी परब,प्रकाश परब यांच्याकडे रथाची चावी देणार असून या सहा जणांना संपर्क साधा. असे आवाहन समीर नलावडे यांनी केले. भाई नलावडे यांचा कणकवली शहराशी असलेला लोकसंपर्क व कणकवली शहरात भाई नलावडे यांची आठवण तेवत रहावी व त्यांच्या राजकीयसह सामाजिक कामाची आठवण राहावी या दृष्टीने हा वैकुंठ रथ लोकार्पण करण्यात आल्याचे नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी सांगितले.
कणकवली शहराबाहेर देखील जिल्ह्यात अन्यत्र जर हा रथ हवा असल्यास इंधनाचा खर्च व चालक यांची व्यवस्था करून हा वैकुंठ रथ न्यायचा आहे. व वापर करून झाल्यावर सर्विसिंग करून पुन्हा ताब्यात द्यायचा आहे. मात्र कणकवली शहरातील मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मागणी केल्यास त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. कणकवली नगरपंचायत जवळ हा रथ ठेवण्यात येणार असून, या रथाचे लोकार्पण करण्यात आले. कणकवलीत दोन पुलाच्यामध्ये ही सेवा मोफत असेल.कणकवली शहरातील नागरिकांसाठी ही सेवा मोफत असेल.त्या रथाला फुलांनी सजवण्यासाठी व्यवस्था आहे.आज पासून मोफत सेवा देण्याचे काम करेल.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बंडू गांगण, भरत उबाळे, अण्णा कोदे, संजय मालडकर, रमेश काळसेकर, समीर पारकर, शिवाजी परब, सदा पारकर, प्रकाश परब आदी उपस्थित होते.
