⚡वेंगुर्ला ता.०४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला भाजपातर्फे आयोजित केलेल्या सेवा पंधरवडाची सांगता महात्मा गांधींची जयंती साजरी करुन करण्यात आली.
तालुका कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला शरद चव्हाण, प्रसन्ना देसाई, दिलीप गिरप, बाळा सावंत, शितल आंगचेकर, बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, मनवेल फर्नांडीस, नितीन चव्हाण, प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे, कृपा गिरप, रसिका मठकर, सचिन नवार, रविद्र शिरसाट, शेखर काणेकर, हेमंत गावडे, भुषण सारंग, सुरेंद्र चव्हाण, दिवाकर कुर्ले आदी उपस्थित होते
