मच्छिमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी

⚡वेंगुर्ला ता.०४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने उभादांडा-मूठ व नवाबाग वाडीतील १५० मच्छिमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली.

  केपादेवी मंदिरात संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन देवस्थान अध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या उपस्थितीत तर नवाबाग शाळेत घेतलेल्या शिबिराचे उद्घाटन सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, वसंत तांडेल यांच्या उपस्थितीत झाले. कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजिक्य शिदे, अवंती गवस, प्रदिप पवार, हिद लॅबचे जिल्हा समन्वयक प्रशांत जाधव, शुभम परब, आशिष परब, शिवराम तवटे आदींनी मच्छिमारांची रक्त तपासणी केली. यावेळी मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, शिक्षक रामा पोळजी, ग्रामस्थ शंकर तारी, श्रीकांत तांडेल, नारायण तारी उपस्थित होते.

फोटोओळी – भाजपातर्फे १५० मच्छिमार कुटुंबांची रक्त तपासणी करण्यात आली.

You cannot copy content of this page