जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण यादव यांची निवड
⚡कणकवली ता.०३-: अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा समाजोन्नती मंडळ जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण तुकाराम यादव यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून समाजाची उन्नती करण्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करू असे नूतन अध्यक्ष बाळकृष्ण यादव यांनी सांगितले.
२००४ साली अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा समाजोन्नती मंडळाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर निर्माण झालेली मरगळ दूर करण्यासाठी युवक वर्गाने पुढाकार घेत नवीन कार्यकारिणी जाहीर केली. यात जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण यादव यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष अमोल अशोक केतकर, सचिव अरविंद सत्यवान केतकर, खजिनदार वैभव विलास वाघाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या निवडीनंतर आपल्या समाजातील युवावर्गला एकत्रित करून जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विखुरलेल्या समाजाला एकत्रित करून समाजाची उन्नती तसेच लोकहिताची कामे आपण करू असा विश्वास जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण यादव यांनी व्यक्त केला. यावेळी अखिल सिंधुदूर्ग जिल्हा सरवदे / सरोदे/ सरोदा समाज बांधव उपस्थित होते.
