सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाने जागतिक पर्यटन दिन सप्ताह सांगता समारंभ

⚡मालवण ता.०३-: मालवण येथील स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी, एनसीसी विभाग, अकाउंटन्सी विभाग व बिजनेस इकॉनॉमिक्स विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख राजश्री सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख राजश्री सामंत यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती दिली आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगितले तर स्किल डेव्हलपमेंट विभागाचे जिल्हा कॉर्डिनेटर अमोल गुराम , आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांनी माहिती देत प्रात्यक्षिके दाखविली

यावेळी कॉलेजच्या अस्मिता वार्षिक अंकाचे प्रकाशन आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख राजश्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पर्यटन सप्ताह मध्ये घेतलेल्या सेमिनार प्रेझेंटेशन व पोस्टर मेकिंग स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर पुणे या ठिकाणी आर्मी अटॅचमेंट काम केलेले कॅडेटस नारायण मुंबरकर व बिरू खरात यांचाही सत्कार करण्यात आला .
यावेळी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत प्रा बी एच चौगुले प्रा कैलास राबते व कॉलेजचे इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता

पर्यटन सप्ताहात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या पोस्टर मेकिंग स्पर्धेतील विजेते: प्रथम क्रमांक वैभव नडगेरी, द्वितीय क्रमांक सेजल कदम, तृतीय क्रमांक राहुल चव्हाण.
कॉलेज स्तरावरील स्टुडंट्स सेमिनार स्पर्धेतील विजेते वर्ग : प्रथम क्रमांक :एफ वाय बी कॉम – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अप्रसिद्ध पर्यटन स्थळे, द्वितीय क्रमांक : एस वाय बी कॉम – साहसी पर्यटन, तृतीय क्रमांक : एस वाय बी ए – इको पर्यटन मालवण एक पर्यटन केंद्र, उत्तेजनार्थ : टी वाय बी कॉम – जबाबदार पर्यटन

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. डॉ. सुमेधा नाईक यांनी आभार प्रदर्शन केले.

You cannot copy content of this page