कृपा व श्रृती यांचे विविध स्पर्धेत यश

⚡वेंगुर्ला ता.०३-: बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदूर्ग यांच्यावतीने बी.एड. महाविद्यालयात जिल्हास्तरावर खुल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.

यात उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या कृपा उत्तम म्हाडदळकर हिने खुल्या गटात उत्तेजनार्थ तर निबंध स्पर्धेत श्रृती श्रीधर शेवडे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. या दोन्ही विद्यार्थीनींचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, प्रा.वैभव खानोलकर, संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर, सचिव रमेश नरसुले यांच्यासह सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page