⚡वेंगुर्ला ता.०३- : मातोश्री कला क्रिडा मंडळाच्यावतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवात खास महिलांसाठी २९ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘खेळ पैठणीचा‘मध्ये वेंगुर्ला शहरातील सिद्धी विनायक वेंगुर्लेकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
उत्तोरत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत सुंदर भाटले येथील दिव्या संदिप यादव हिने सोन्याची नथ तर दाभोली नाका येथील श्रावणी कृष्णा भोगटे हिने प्रेशर कुकर पटकाविला. नवरात्रोत्सव कालावधीत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी ८ वाजता जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सामाजिक कार्यकर्ते विलास गावडे व विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
