जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत निरजा माडकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०३-: मातोश्री कला क्रिडा मंडळाच्यावतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव दरम्यान १ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत वेंगुर्ला येथील निरीजा भालचंद्र माडकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला.

  या स्पर्धेत सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ला तालुक्यातून २७ स्पर्धक सहभागी झाले होते. सावंतवाडी येथील निधी विजय खडपकर हिने द्वितीय, सावंतवाडी येथील काव्या प्रविण गावडे हिने तृतीय तर पिगुळी येथील श्रीधर पिगुळकर याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेचे परिक्षण तुळशीदास आर्लेकर (सावंतवाडी) यांनी केले.
You cannot copy content of this page