अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी आक्रमक पवित्रा;१२ रोजी करणार आंदोलन
सावंतवाडी ता०३-:गोव्यातून सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात अवैद्य रित्या चोरट्या पद्धतीने दारूची वाहतूक सुरू असून, याकडे सिंधुदुर्गातील तपासी पथक तीन चेक पोस्ट असूनही, एखाद्यावेळीच कारवाई करत आहे तर इतरवेळी या विषयात लक्ष घालत नाही. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी 12 ऑक्टोंबर रोजी मनसेकडून इन्सुली चेकपोस्ट कार्यालय समोर डब्बे वाजवा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष मंदार नाईक यांनी निवेदनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
