⚡वेंगुर्ला ता.०३-: मातोश्री कला क्रिडा मंडळाच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात दोन गटात झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तनिष्का केळुसकर व वरदा परब यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
शहरातील प्रसिद्ध दाभोली नाका येथे मातोश्री कला क्रिडा मंडळाच्यावतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन केले असून २८ सप्टेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे -
वयोगट ५ ते ८ वर्षे - प्रथम-तनिष्का गुंजन केळुसकर (शिक्षिका), द्वितीय-प्रांजल रमेश गावडे (प्लास्टिक पिशवी), तृतीय-आराध्या मंदार राऊळ (डेटॉल हॅण्ड वॉश), उत्तेजनार्थ - शुभ्रा सदाशिव अंधारी (जिजाऊ माता) व भुमिका चंद्रकांत गिरप (भाजीवाली). वयोगट ९ ते ११ वर्षे - प्रथम-वरदा संदिप परब (शिवाजी महाराज), द्वितीय-ओजस सुहास परब (मासेवाला) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण संजय पाटील यांनी केले.
