मळगाव येथील शारदा विद्यालयात सरस्वती पूजन सण उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.०३सहदेव राऊळ -: मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शारदा विद्यालय मळगाव रस्तावाडी या प्रशालेमध्ये श्री देवी सरस्वती पूजन सण उत्साहात साजरा करण्यात आला.
यनिमित्त सकाळी सरस्वती देवीचे ब्राम्हणाच्या साक्षीने विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी सरस्वती देवीवर अभिषेक व मंत्रपुष्पाजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत देवीची आरती व त्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, शिक्षिका अस्मिता गोवेकर, सीमा सावंत, गोपाळ नार्वेकर, विजय ठाकूर, मानसिंग शिरोडकर, नामदेव नाटेकर, सुधीर राऊळ उपस्थित होते. त्यानंतर तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. छोट्या मुलांनी एका रांगेत राहून श्री देवी सरस्वतीचे दर्शन घेतले. दुपारी सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मळगावातील नागरिकांनी उपस्थित राहून सरस्वती देवीचे दर्शन घेत तीर्थप्रसादाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांच्या फुगड्या, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page