संत निरंकारी मिशनद्वारा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

⚡कणकवली ता.०३-: निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतवर्षामध्ये विशाल ‘स्वच्छता अभियान’ भारतीय रेल्वे आणि अन्य शासकीय ठिकाणांवर प्रशासनाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आले होते. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन द्वारा करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय- कणकवली, ग्रामीण रुग्णालय – वैभववाडी, उपजिल्हा रुग्णालय – मालवण आणि पडेल, देवगड परिसरामध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले ज्यामध्ये मिशनचे सर्व संयोजक,मुखी,सेवादल अधिकारी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने सम्मिलीत होऊन रुग्णालय परिसराची साफसफाई केली. रुग्णालय प्रशासनाचे मोलाचे योगदान हे अभियान संपन्न होण्यासाठी लाभले. संपूर्ण भारत देशात ५० हुन अधिक शहर आणि नगरांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.
संत निरंकारी मिशन सन २०१५ पासून ‘स्वच्छ भारत अभियानाचे’ एक अभिन्न अंग राहिले असून मिशनला भारत सरकारने ‘स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अम्बॅसेडर’ म्हणून घोषित केले आले आहे.
या अभियानामध्ये गणमान्य व्यक्ती आणि मुख्य अतिथी डॉ.धर्माधिकारी, डॉ. हनुमंते व अभियान ठिकानवरील वैद्यकीय अधिकारी आदी मान्यवर होते. त्यांनी निरंकारी मिशनच्या कार्याची प्रशंसा करताना सांगितले कि जसे शरीर आपण स्वच्छ ठेवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा परिणामी प्रसन्न वातावरण व निरोगी मन, आरोग्याचा लाभ होईल. हे मिशन सदैव मानव कल्याणार्थ नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मिशनच्या माध्यमातून वेळोवेळा स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर याव्यतिरिक्त अनेक सामाजिक उपक्रम सुंदर पद्धतीने राबविले जातात.कणकवली सेक्टरचे संयोजक विलास जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच रुग्णालय प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page