⚡मालवण ता.०२-: कोरोना महामारी नंतर गेल्या दोन वर्षात कोकणातील पर्यटन वाढीसाठी
बीच टुरिझम बरोबरच हिस्ट्री , कल्चर, मेडिकल, हेरिटेज, फूड टुरिझमच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या कार्याची दखल राज्य शासनाने घेत यावर्षीचा पर्यटन मित्र २०२२ पुरस्कार जाहीर करून तो नुकताच वेंगुर्ला येथे प्रदान केला आहे
पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणातील पर्यटन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवित असून बीच टुरिझम बरोबरच हिस्ट्री , कल्चर , मेडिकल, हेरिटेज, फूड टुरिझमच्या माध्यमातून कोकणामध्ये बारमाही पर्यटन चालू होऊ शकते तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी कार्य करत आहे .दोन वर्षाच्या कोरोना नंतर पर्यटन व्यवसाय पूर्व पदावर येताना व्यावसायिकांना आवश्यक असलेली ट्रेनींग आर्थिक उभारणीसाठी महासंघातर्फे प्रयत्न केले जात असून या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारचा पर्यटन संचालनालय मार्फत दिला जाणारा पर्यटन मित्र पुरस्कार जागतिक पर्यटन दिनी वेंगुर्ला येथे झालेल्या पर्यटन चर्चासत्र कार्यक्रमात माजी आमदार आणि पर्यटन संचालनालयचे उपाध्यक्ष श्री प्रमोद जठार , वरिष्ठ प्रादेशिक पर्यटन अधिकारी संजय ढेकणे, श्री प्रशांत वाणी, कर्नल श्री.सुधीर सावंत, माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थित देण्यात आला.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी महासंघाच्या कोकण क्षेत्रात चालू असलेल्या कार्याची दखल राज्य सरकारने घेतल्याबद्दल आभार व्यक्त करून येणाऱ्या काळात पर्यटन व्यावसायिकां भेडसविणारे प्रश्न प्रामुख्याने सरकारने मार्गी लावावे असे सांगितले
