⚡मालवण ता.०२-: राष्ट्रीय पोषण माह अभियान २०२२ अंतर्गत ‘अम्मा की रसोई’ अंतर्गत पालकांसाठी पाककला स्पर्धा व मुलांसाठी रानभाज्या प्रदर्शनाचा उपक्रम लायन्स क्लब ऑफ मालवण च्या सहयोगाने मालवण वायरी येथील रेकोबा माध्यमिक विद्यालय व अंबाजी विद्यालय यांनी आयोजित केला होता.
यावेळी दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी लायन्स अध्यक्ष वैशाली शंकरदास व विश्वास गावकर यांनी या स्पर्धेची बक्षीसे पुरस्कृत केली. स्पर्धेला पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. रानभाज्यांमुळे मुलांना वेगवेगळ्या भाज्यांची ओळख व माहिती मिळाली.
यावेळी लायन्स कलबाच्या अध्यक्षा सौ. वैशाली शंकरदास, सचिव सौ. अनुष्का चव्हाण, खजिनदार सौ. अंजली आचरेकर, सौ. पल्लवी तारी- खानोलकर, रेकोबा विद्यालयाच्या मुख्याध्यापक सौ. शुभदा शिंदोळकर, अंबाजी विद्यालयचे मुख्याध्यापक गणपत चौकेकर आदी व इतर उपस्थित होते.
